पुणे: बायको आणि तिच्या प्रियकराकडून छळ, रेल्वेखाली उडी टाकत नवऱ्याने केली आत्महत्या
Image used for representational purpose | Photo Credits: File Photo

पुण्यात (Pune) एका विवाहित तरुणाने बायको आणि तिच्या प्रियकाराच्या छळाला कंटाळून रेल्वेखाली उडी टाकत आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे. याबद्दल मृत तरुणाच्या वडिलांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराबद्दल गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पुणे मिररने दिली आहे.

मोहम्मद अगसर असे या तरुणाचे नाव आहे. मोहम्मद ह्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्यामुळे चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अश्मा असे बायकोचे नाव असून तिने मोहम्मदकडे मागणी केली. त्यामुळे नवऱ्याने कोंढवा येथे घरसुद्धा घेतले. तेथे दोघे एकत्र राहू लागले होते. त्यानंतर बायोकाच्या छळाला कंटाळून तो परिवारासोबत राहत असल्याचे मोहम्मदच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले.(हेही वाचा-ठाणे: डान्सबारमध्ये काम करणाऱ्या पत्नीची हत्या, पिंप ठरला साक्षीदार; गुन्हेगार पतीला बेड्या)

तसेच मोहम्मद ह्याला आश्मा आणि तिच्या प्रियकराने मारहाण सुद्धा केली असल्याचे वडिलांनी स्पष्टीकरण दिले आहे. तर कोंढावा येथील घर आपल्या नावावर करण्यासाठी बायकोकडून त्याला वारंवार त्रास देण्यात येत होता. मात्र या त्रासाला कंटाळून मोहम्मद ह्याने आत्महत्या केली. तर सूसाईड नोटसुद्धा सापडली असून त्यामध्ये आश्मा, तिचा प्रियकर आणि आश्मा हिची आई या प्रकाराला कारणीभूत असल्याचे मोहम्मदने लिहिले आहे.