Mumbai Pune Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग 'या' दिवस एक तास बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती
Mumbai Pune Expressway Traffic | (Photo Credit - Twitter)

Mumbai Pune Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एक तासाचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. तीन दिवसांत दुपारी 12 ते 1 या कालावधीत द्रुतगती मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुक सेवा बंद राहणार आहे. प्रवाशांनी ब्लॉक लक्षात घेऊन त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन पुणे अधिकाऱ्यांनी केले आहे. 17,19 आणि 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये द्रुतगतीमार्गावरील मुंबई आणि पुणे वाहिनीवर वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRDC) या कालावधीत महामार्ग वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (HTMS) अंतर्गत: गॅन्ट्री स्थापित करणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळा बोगदा आणि लोणावळा येथे अनुक्रमे 47/900 किमी आणि 50/100 किमी पुणे लेनवर 17 ऑक्टोबर रोजी इंस्टॉलेशनचे काम केले जाईल. त्याचप्रमाणे मुंबई लेनवर किमी 44/800 येथे हे काम केले जाईल. दस्तुरी पोलीस चौकीजवळ, 18 ऑक्टोबर रोजी खालापूरजवळ किमी 33/800 आणि ढेकू गावाजवळ किमी 37/800 आणि 19 ऑक्टोबर रोजी किमी 36. 26 ऑक्टोबर रोजी खोपोली एक्झिटजवळ किमी 47/120 असं काम केल जाईल.

तीनही दिवस दुपारी 1 नंतर हा रस्ता वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. द्रुतगती मार्गावर एचटीएमएस प्रणाली बसविण्याची योजना महामार्ग प्राधिकरणाने यापूर्वी जाहीर केली होती. रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थापन करणे आणि अपघातांची शक्यता कमी करणे हे या प्रणालीचे उद्दिष्ट आहे. या आधी मुंबई एक्स्प्रेस वेवर 10 ऑक्टोबर रोजी ब्लॉक घेण्यात आला होता.