आज (1 सप्टेंबर) अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) दिवशी 10 दिवसांच्या गणपती बप्पांचं विसर्जन सुरू झालं आहे. घराघरातील गणपती सार्वजनिक करणार्या लोकमान्य टिळकांच्या पुणे (Pune) शहरात गणेशोत्सवाची मोठी धामधूम असते. परंतू यंदावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सहकार्य करा या प्रशासनाच्या आवाहनाला पुणेकरांनी प्रतिसाद दिला आहे. आज अत्यंत साधेपणाने पुणे शहरातील पाचही मानाच्या गणपतींचे अत्यंत साधेपणाने विसर्जन संपन्न झाले आहे. Ganesh Visarjan 2020: पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची शहरातील गणेश विसर्जन सोहळ्याला हजेरी; पहा फोटो.
कसबा पेठ गणपती
पुण्यनगरीचं ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री. कसबा गणपतीचं पुणेकरांच्या वतीनं दर्शन घेऊन विसर्जनाला सुरुवात केली. परंपरेचा भाग म्हणून काही पावले पुढे जात मांडपात तयार केलेल्या कृत्रिम हौदात सकाळी साडे अकरा वाजता विसर्जन संपन्न झाले. pic.twitter.com/VjWqtUbqiU
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) September 1, 2020
तांबडी जोगेश्वरी गणपती
ग्रामदेवता आणि मानाचा दुसरा श्री. तांबडी जोगेश्वरी गणपतीचं पुष्पहार अर्पण करुन दर्शन घेतलं. या मंडळानेही आपल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मंडपासमोर कृत्रिम हौद उभारून बाप्पाचं विसर्जन केलं. मंडळांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद ! pic.twitter.com/D8fsmhoqlz
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) September 1, 2020
सकाळी 11.30 च्या सुमारास मानाचा पहिला गणपती कसबा पेठ गणपतीचं विसर्जन झालं. त्यावेळेस परंपरेनुसार सभा मंडपाजवळच कृत्रिम तलावामध्ये विसर्जन झालं. त्याला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. त्यानंतर पुण्याच्या मानाच्या दुसर्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचं देखील कृत्रिम तलावामध्ये मोजक्या गणेशभक्तांच्या उपस्थितीमध्ये विसर्जन झाले. त्यानंतर पुण्यातील तिसरा मानाचा गणपती गुरूजी तालीम गणपती 1 च्या सुमारास विसर्जित झाला. चौथा मानाचा तुळशीबाग गणपती पावणे दोनच्या सुमारास विसर्जित झाला. नंतर पाचवा मानाचा गणपती केसरी वाडा गणपती दुपारी अडीचच्या सुमारास कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित झाला आहे. Ganpati Visarjan Messages in Marathi: अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पच्या विसर्जनाला मराठी WhatsApp Stickers, Quotes, Images शेअर करून गणेशभक्तांना द्या शुभेच्छा.
दरम्यान यंदा 85-90% गणेशभक्तांनी घरच्या घरीच बाप्पाचं विसर्जन केले आहे. तसेच पुणे पालिकेकडून इतर गणपती विसर्जनासाठी खास सोय, फिरते हौद, कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले आहेत. नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळत गणपती बाप्पाला निरोप देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आज तिन्ही सांजेला श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं विसर्जन केलं जाणार आहे. पुण्यामध्ये यंदा विसर्जन मिरवणूका नसतील, गुलालाची उधळण नसेल तसेच ढोल-ताशांच्या मिरवणूकांवर्देखील बंदी कायम असेल.