पुणे जिल्ह्यातील या आमदारांना लागू शकते मंत्रिपदाची लॉटरी
BJP | | Image only representative purpose (Photo credit: File Image)

विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात सरकार स्थापनेसाठी भाजपच्या गोटात हालचाली सुरु आहेत. मात्र, त्याला शिवसेनेची अपेक्षीत साथ न मिळाल्याने सरकारस्थापनेचे घोंगडे भिजत पडले आहे. असे असले तरी भाजप-शिवसेना युती सरकार आस्तित्वात आल्यानंतर कोणकोणत्या आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते याबाबत राजकीय वर्तुळात अंदाज व्यक्त केले जात आहे. पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातही अशीच चर्चा सुरु असून, जिल्ह्यातील एकूण 21 मतदारसंघातील आमदारांपैकी कोणत्या आमदाराला मंत्रिपद मिळू शकते याबबत उत्सुकता आहे. काही नावेही जिल्ह्याच्या राजकारमात आघाडीवर आहेत. त्यात चंद्रकांत पाटील (Chandrakant Bacchu Patil), हर्षवर्धन पाटील (Mukta Tilak), मुक्ता टिळक (Mukta Tilak), लक्ष्मण जगताप , माधुरी मिसाळ माधूरी मिसाळ यांच्या नावाचा समावेश आहे.

चंद्रकांत पाटील यांना मंत्रीपद मिळणार नक्कीच आहे. ते विद्यमान महसूलमंत्रीही आहेत आणि महाराष्ट्र भाजप अध्यक्षही आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचे नाव पुणे जिल्ह्यातून नक्की आहे. पाटील यांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी मनसे उमेदवार किशोर शिंदे यांचा पराभव केला. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्यापाठोपाठ मुक्ता टिळक, माधुरी मिसाळ यांच्या नावाचीही पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. मात्र, त्यांची नावे ही तितक्या सक्षमपणे घेतली जात नाहीत. परंतू, त्यांना मंत्रीपदासाठी त्यांची निवड होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (हेही वाचा, भाजप-शिवसेना महायुती ची 'ही' असू शकते संभावित मंत्र्यांची यादी; पाहा कोणाला मिळू शकतं कोणतं खातं?)

पुणे जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय आमदारांची नावे

आंबेगाव – दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी

इंदापूर – दत्तात्रय भरणे,राष्ट्रवादी,

कसबा – मुक्ता टिळक, भाजप

कोथरुड – चंद्रकांत पाटील, भाजप

खडकवासला – भिमराव तापकीर, भाजप

खेड–आळंदी – दिलीप मोहिते, राष्ट्रवादी

चिंचवड – लक्ष्मण जगताप, भाजप

जुन्नर – अतुल बेनके, राष्ट्रवादी

दौंड – राहुल कुल, भाजप

पर्वती – माधुरी मिसाळ, भाजप

पिंपरी – अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी

पुणे छावणी – सुनील कांबळे, भाजप

पुरंदर – संजय जगताप, काँग्रेस

बारामती – अजित पवार, राष्ट्रवादी

भोर – संग्राम थोपटे, काँग्रेस

भोसरी – महेश लांडगे, भाजप

मावळ – सुनील शेळके, राष्ट्रवादी

वडगाव शेरी – सुनील टिंगरे, राष्ट्रवादी

शिरुर – अशोक पवार, राष्ट्रवादी

शिवाजीनगर – अनिल शिरोळे, भाजप

हडपसर – चेतन तुपे, राष्ट्रवादी

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्याही नावाची मंत्रिपदासाठी चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि भाजप प्रवेश केला. भाजप तिकीटावर त्यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दत्ता भरणे यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे मंत्रिपद देऊन भाजप हर्षवर्धन जाधव यांचा पुनर्वसन करण्याची शक्यात वर्तवली जात आहे.