राज्यात यंदा पावसाची हजेरी कमीच राहिली. मान्सूनने यंदा राज्यात उशीरा हजेरी लावली त्यामुळे जून महिना हा कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने थोडी फार हजेरी लावली. यानंतर ऑगस्ट महिना देखील कोरडाच गेला. संप्टेंबर महिन्यात राज्यात चांगला पाऊस झाला यामूळे राज्यात थोड्याफार प्रमाणात पाण्याचा साठा हा जमा झाला. गेल्या महिन्यातील पहिल्याच आठवड्यात पुण्यात पावसाने दमदार बॅटींग केली. धो-धो पाऊस बरसला असला तरी पुणेकरांना पाणी जपूनच वापरावे लागणार आहे. कारण चार धरणांमधील पाणीसाठा ४ टक्क्यांनी कमी झालाय. (हेही वाचा - Ajit Pawar यांचा राजीनामा, पार्थ पवार PDCC मार्फत नव्याने श्रीगणेशा करण्याची शक्यता)
पुण्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी आहे. कमी पाणीसाठ्यामुळे शहरातील नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या वर्षी 4 टक्क्यांनी कमी पाणी जमा झाले आहे. खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये 95.81 टक्के पाणी जमा झाले आहे. मागील वर्षी या कालावधीत 99.83 टक्के पाणी जमा झाले होते.
गेल्यावर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा कमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 1.17 टीएमसी पाणी कमी झाले आहे. यंदा परतीचा पाऊस सप्टेंबरमधील शेवटच्या आठवड्यात चांगला पडला. परिणामी धरण साठ्यात चांगली वाढ झालीये आणि पाणीकपातीपासून सुटका मिळाली आहे. असे असले तरी खडकवासला धरणातील पाणीसाठ्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.