Pune Crime: पुण्यात गुन्हेगारी थांबायचं नावंच घेत नाही, दरम्यान आळंदीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वारकरी संप्रदायाला हेलावून टाकणारी ही घटना आहे. आळंदीतील एका महाराजाने तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक कृत्य करून त्यांचे लैंगित शोषण केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी संशयित आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आणि पोलिसांनी त्याला अटक केले आहे. (हेही वाचा- सोशल मीडियावर चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबधित आक्षेपार्ह मजकूर शेअर केल्याप्रकरणी ४ जणांवर गुन्हा दाखल)
मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी येथील दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर (वय वर्ष 52) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दासोपंत महाराज आळंदीमध्ये मृदुंग वादन शिकवणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थेचा संचालक आहे. या शाळेत 60 ते 70 विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. मात्र दोन महिन्यापूर्वी दासोपंत यांनी एका विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने अन्य दोन अल्पवयीन मुलांसोबतही अनैसर्गिक कृत्य केले. या तीन मुलांवर अनेकवेळा अनैसर्गित अत्याचार केले आणि कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
एका मुलाने ही गोष्ट वडिलांच्या कानावर घातली आणि त्यानंतर त्याच्या पालकाने थेट पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला. सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली. या घटनेची माहिती वरिष्ठांच्या कानावर घातली त्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या घटनेत हस्तक्षेप करत आरोपीला अटक केली. आता पर्यंत आरोपी दामोपंत यांनी तीन मुलावंर अत्याचार केल्याचे आरोपात सांगितले आहे.