Mumbai News: सोशल मीडियावर चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबधित आक्षेपार्ह मजकूर शेअर केल्याप्रकरणी ४ जणांवर गुन्हा दाखल
Molestation | (Photo Credits: Archived, edited)

Mumbai News: चाइल्ड पॉर्नोग्राफीचा (Child Pornography) आक्षेपार्ह कंटेन्ट सोशल मीडियावर शेअर केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपांनी फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चाइल्ड पोर्नोग्राफी क्लिप अपलोड केल्या होत्या.( हेही वाचा- Nude Photos साठी Apple स्कॅन करणार तुमचा फोन; Child Porn ला आळा घालण्यासाठी कंपनीने उचलले मोठे पाऊल)

मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या प्रकरणात, फिरोज हवारिया आणि विकी डीजे या संशयितांनी डिसेंबर २०२० रोजी फेसबुकवर १३ सेंकद आणि १५ सेंकदाच्या दोन व्हिडिओ क्लिप अपलोड केल्या होत्या. दुसऱ्या प्रकरणात, पोलिसांनी १४ सेकंदाची क्लिप आढळून आली होती. ज्यामध्ये लहान मुलांचा समोवेश होता. डिसेंबर २०२० मध्येय एका युजर्सनी व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोर्नोग्राफी कंटेन्ट अपलोड केली होती. तीसऱ्या प्रकरणात पोलिसांनी २६ सेकंदाच्या क्लिपची माहिती मिळाली. हा व्हिडिओ नानहक कुमार नावाच्या एका व्यक्तीने जानेवारी २०२१मध्ये फेसबुकवर अपलोड केली होती.

पोलिसांनी यावर लक्ष ठेवून संशयिताचा शोध घेतला आणि संशयित आक्षेपार्ह कंटेन्ट अपलोड करण्यासाठी वापरलेले आयपी अॅ़डरेस, फेसबुक आणि इंस्टाग्राम अॅकाऊंट प्रोफाईल आणि त्यांचे फोन नंबर तपशील शोधून काढले. पोलिसांनी या प्रकरणी ४ अज्ञाताविरुध्दात गुन्हा दाखल केला आहे.पोलिस आरोंपीच्या शोधात आहे.