Pune Crime: धक्कादायक! कुत्र्यापाठोपाठ आता म्हशीवरही अनैसर्गिक लैगिक अत्याचार, नागरिकांकडून आरोपीस बेदम चोप
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

पुण्यात (Pune) आणखी एक माणुसकीला काळीमा फासणार प्रकार पुढे आला आहे. या पुढेही घोरपडीवर किंवा श्वानावर अनैसर्गिक लैगिक अत्याचाराच्या बातम्या आपण ऐकल्या आहेत. पण यावेळी तर म्हशीवर अनैसर्गिक लैगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार पुढे आला आहे. डेक्कन जिमखाना (Deccan Gymkhana) परिसरात एका 35 वर्षीय व्यक्तीने हे कृत्य केलं आहे. डेक्कन जिमखाना हा पुण्यातील वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक आहे आणि या ठिकाणी असा प्रकार उघडकीस येणे हे धक्कादायक आहे. आरोपी मुळचा नेपाळचा (Nepal) असल्याची माहिती डेक्कन जिमखाना पोलिसांनी दिली आहे. आरोपीने म्हशीवर एका अंधाऱ्या, निर्जन ठिकाणी झाडाला बांधून लैंगिक अत्याचार केले. काही वाटसरूंनी म्हशीच्या रेडक्याचा रडण्याचा आवाज ऐकून  घटनास्थळी दाखल झाले. बघता तर काय एक इसम म्हशीच्या रेडक्यावर अत्याचार करताना दिसला. तोच नागरीकांनी त्या आरोपीचा पाठलाग केला आणि त्या इसमास पकडून बेदम चोप दिला. या मारहाणीत आरोपी बेशुद्ध पडला.

 

तरी सध्या या आरोपीला ससून रुग्णालयात (Sasun Hospital) दाखल करण्यात आलं आहे. आरोपी बरा झाल्यावर त्याला अटक करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी एका 28 वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार व्यक्ती नदीपात्रातील एका हॉटेलमध्ये कॉफी घेत होता. त्यावेळी त्याला एका अज्ञात व्यक्तीने नदीपात्रात म्हशीच्या रेडक्यासोबत अनैसर्गिक प्रकार घडत असल्याचं सांगितलं. (हे ही वाचा:- Dengue Cases In Pune: पुण्यात यावर्षी गेल्या तीन महिन्यात डेंग्यूचे 3,000 हून अधिक संशयित रुग्ण)

 

त्यावेळी काही जणांनी या व्यक्तीला अनैसर्गिक कृत्य करताना पाहिलं. म्हशीच्या रेडक्याच्या आवाजाने आजूबाजूच्या लोकांनी पाहणी केली असता हा प्रकार उघड झाला. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे पाळीव कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले होते.