Video Shooting

पुण्यातील सीओईपी कॉलेजच्या वसतिगृहातील एका (Pune Crime) विद्यार्थिनीने आपल्या रूमपार्टनरचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ बनवून बॉयफ्रेंडला पाठवल्याचा (Boyfriend) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे व्हिडिओ समोर आल्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी कॉलेज व्यवस्थापनाकडे तक्रार केली.  या तक्रारीनंतरही व्यवस्थापनाने कोणतीही कारवाई न केल्याने या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या आधारे हा प्रकार सर्वांसमोर आणला. सगळा प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (हेही वाचा - Condom Water: कंडोमचा तरुणाई करत आहे नशा, विचित्र कृत्यामुळे राज्यात कंडोमच्या विक्रीत वाढ, जाणून घ्या काय आहे संपूर्ण माहिती)

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्या गिरीश काळे आणि  विनीत सुराणा या दोन जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आर्या हिने हॉस्टेलमधील विद्यार्थिनींचे चे चोरून व्हिडिओ फोटो काढून तिचा मित्र विनीत सुराणा याला पाठवले. या प्रकरणी आर्या आणि विनीत सुराणा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमके हे कृत्य त्यांनी का केले याचा तपास पोलीस करत आहेत. शिवाजीनगरयेथील या शासकीय महाविद्यालयात एवढी मोठी घटना घडल्यानंतरही प्रशासन गप्प राहिल्याने प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहेत. आरोपी मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करणारी कॉलेज व्यवस्थापनाची व्यक्ती कोण आहे, याची चौकशी करून त्याच्यावरही पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

काही दिवसांपासून वसतिगृहातील एक विद्यार्थिनी आपल्या तीन रूममेटचे कपडे बदलताना व्हिडिओ बनवत होती. ही विद्यार्थिनी व्हिडिओ बनवून थेट आपल्या बॉयफ्रेंडला पाठवत असे. आरोपी विद्यार्थिनी हा व्हिडिओ तिच्या बॉयफ्रेंडला का देत होती, याची चौकशी केली जात आहे.