भाजपा आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक जाहीर झाली आहे. 27 फेब्रुवारीला होणार्या या निवडणूकीसाठी काल भाजपा कडून अश्विनी जगताप आणि हेमंत रसने यांना उमेदवारी झाली आहे. पण यानंतर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन केले आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपत विद्यमान आमदाराचं निधन झाल्यास त्याजागी बिनविरोध निवडणूक होते. पण मागील काही महिन्यात महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून निघाल्यानंतर वारंवार भाजपा विरूद्ध महाविकास आघाडीचे नवनवे डाव प्रतिडाव समोर येत आहेत.
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज प्रतिक्रिया देताना राज ठाकरेंनी पत्र लिहलं असले तरीही किंवा मुख्यमंत्र्यांकडून, उपमुख्यमंत्र्यांकडून आवाहन आले तरीही सध्या कसबा आणि चिंचवडची निवडणूक आम्ही लढण्याच्या तयारीत आहे. ही निवडणूक व्हावी अशी लोकांची इच्छा असल्याचाही संजय राऊत यांचा दावा आहे. आता कॉंग्रेस आणि एनसीपी सोबत बसून महाविकास आघाडी पुढील निर्णय घेईल असे राऊत म्हणाले आहेत. विधानपरिषदेच्या निकालावरुन सरकार विरोधात असणारं वातावरण दिसून आले आहे त्यामुळे या निवडणुका लढवण्याचा महाविकास आघाडीनं निर्णय घेतला आहे. असेही ते म्हणाले. नक्की वाचा: Raj Thackeray On Pune By-election: राज ठाकरे यांचं महाविकास आघाडीला पत्र; कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन .
बिनविरोध निवडणूकांच्या परंपरेबाबत बोलाताना संजय राऊतांनी रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी बिनविरोध लढून यावी म्हणून भाजपाने उमेदवार मागे घेतला असला तरीही महाराष्ट्रात पंढरपूरला आणि नांदेडला देखील पोटनिवडणूक झाली होती. तिथे अपवाद पाळला नसल्याचे संजय राऊत यांनी निदर्शनास आणून दिले आहे. तसेच ' निवडणूक बिनविरोध करायचीच असल्यास भाजपानेच आपले उमेदवार मागे घ्यावेत आम्ही काय ते बघून घेऊ असं म्हणत राऊतांनी भाजपाला चिमटा काढला आहे.