पुण्यातील (Pune) प्रसिद्ध उद्योगपती योहान पूनावाला (Yohan Poonawalla) आणि त्यांची पत्नी मिशेल पूनावाला (Michelle Poonawalla) यांनी मुंबईत (Mumbai) एक आलिशान घर खरेदी केले आहे. सध्या सर्वत्र या घराची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, योहान पूनावाला यांनी दक्षिण मुंबईतील कफ परेड परिसरात (Cuffe Parade) हे घर खरेदी केले आहे.
योहान पूनावाला यांच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. मुंबईच्या कफ परेड परिसरामध्ये अनेक प्रसिद्ध आणि दिग्गज लोक व व्यापारी राहतात. मुकेश अंबानी यांचे धाकटे भाऊ अनिल अंबानी यांचे घरही याच भागात आहे.
मुंबईच्या या पॉश भागात योहान पूनावाला यांनी घर विकत घेतल्याच्या बातम्या वर्तमानपत्रे आणि टीव्ही चॅनल्समध्ये प्रसिद्ध होत आहेत. मात्र, अजूनतरी या घराबाबत इतर कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मालमत्ता बाजारातील सूत्रांकडून मिळालेल्या अंदाजानुसार, कप परेड परिसरात बांधलेली ही हवेली तारापोरवाला, 20 व्या शतकातील वारसा मालमत्ता असू शकते, ज्यामध्ये लेखक मुल्क राज आनंद एकेकाळी राहत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ग्राऊंड प्लस तीन मजली मालमत्ता गेल्या अनेक वर्षांपासून विक्रीसाठी उपलब्ध होती. (हेही वाचा: Mumbai MHADA Lottery 2024: म्हाडाकडून मुंबईमधील 2030 घरांच्या विक्रीची सोडत जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा व कुठे कराल अर्ज)
दरम्यान, 52 वर्षीय योहान हे पूनावाला इंजिनिअरिंग ग्रुपचे अध्यक्ष आहेत. ते एल-ओ-मॅटिक इंडियाचेही मालक आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांचे चुलत भाऊ असलेल्या योहान हे, इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे शेअरहोल्डरही आहेत. देशातील श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट आहे. त्यांची पत्नी मिशेल पूनावाला एक कलाकार आहे. मिशेल यूके आणि पुण्यात काम करते. मिशेल पूनावालाचा हवामान बदल, सामाजिक कार्य, पर्यावरण अशा इतर अनेक कामात सहभाग आहे.