पुणे-बंगळुरु (Pune Banglore Highway) येथील राष्ट्रीय महामार्गावर कारचालकाचा ताबा सुटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाच घरातील सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच जखमी झालेल्या व्यक्तींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
महामार्गावरुन जाताना कार चालकाचा ताबा सुटल्याने गाडी झाडाला जोरदार धडकली. तेव्हा जागीच सौदागर कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. तर चालक आणि एक अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाले आहेत.(पुणे: मुलांची हत्या आणि आईची आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा! वडिलांकडूनच दोन्ही चिमुरडींवर बलात्कार)
तर मृत झालेल्या व्यक्तींमध्ये दोन पुरुष, महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून सौदागर कुटुंबिय धारवाड येथील रहिवासी असल्याचे बोलले जात आहे.