फोटो सौजन्य- Pixabay

पुण्यामध्ये एका वापाऱ्याला बंदूकीचा धाक दाखवून 5 लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बलराम बन्सीलाल अहुजा असे या व्यापाराचे नाव आहे. तर पुण्यात बलराम यांचे दारुचे दुकान आहे. रात्री दहाच्या नंतर दुकान बंद करुन घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी समोरुन काळ्या रंगाच्या गाडीतील दोन अज्ञात व्यक्तींनी बलराम यांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडे असलेल्या पाच लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन पसार झाले आहेत.

या प्रकरणी बलाराम यांनी पोलिसात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच या भामट्यांच्या गाडीला नंबर प्लेट नसल्याने तपास करण्यात अडथळा येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.