Pune: बनावट Remdesivir Injections विकणाऱ्या 4 जणांना बारामती मधून अटक
Pune 4 people arrested for selling fake Remdesivir Injections | (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने (Coronavirus Second Wave) राज्यात धुमाकूळ घातला आहे. दररोज कोरोना रुग्णांमध्ये होणारी मोठी वाढ आणि अपुऱ्या पडणाऱ्या आरोग्य सुविधा, रेमडेसिवीर इंजेक्शन (Remdesivir Injections), लसी (Vaccine) यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार, फेक कोरोना रिपोर्ट्स यामुळे समस्या अधिक वाढत आहे. दरम्यान, बारामती (Baramati) मध्ये बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन विकणाऱ्या 4 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 3 इंजेक्शन्स जप्त करण्यात आली आहेत.

हे चारही जण इंजेक्शन्सवर 'रेमडेसिवीर' असे लेबल लावून विकत होते. इंजेक्शन्सच्या बाटलीवर रेमडेसिवीर लेबल लावून त्यात पॅरासिटामोल द्रव स्वरूपात भरण्यात आले होते, अशी माहिती पुणे ग्रामीण उपायुक्त नारायण शिरगावकर यांनी दिली आहे. (कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'Pune Break The Chain' साठी पुणे महापालिकेकडून देण्यात आले सुधारित आदेश)

ANI Tweet:

दरम्यान, यापूर्वी कोविड-19 RT-PCR चाचणीचे फेक रिपोर्ट्स देणाऱ्या दोघांना काल रात्री पुण्यात अटक करण्यात आली होती. कोरोना रुग्णांमध्ये होणारी मोठी आणि त्यामुळे रिपोर्ट्स तयार करण्यासाठी होणारा विलंब यामुळे तक्रारी वाढत होत्या. त्यामुळे आरोपींनी अनेक लोकांना फेक अहवाल दिला असल्याचे डेक्कन जिमखाना पोलिस स्टेशनकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.