धक्कादायक! नागरिकांकडून प्रेमी युगुलाची गावभर धिंड; भंडारा जिल्ह्यातील कोंढा गावातील घटना
(Archived, edited, symbolic images)

एकमेकांसोबत विवाहबाह्य संबंध असल्याच्या कारणावरुन नागरिकांनी एका प्रेमी युगुलाची गावभर धिंड काढली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्याती कोंढा गावात घडली. गावातील एका महिलेचे गावातीलच एका व्यक्तिसोबत संबंध होते. या संबंधामुळे या युगुलातील पुरुषाच्या घरात ताणाव होता. त्यामुळे पुरुषाच्या चिडलेल्या कुटुंबियांनी महिलेची गावभर धिंड काढली. ही धिंड काढण्यासाठी गावकरीही सहभागी झाल्याचे समजते.

प्राप्त माहितीनुसार, या युगुलातील महिला ही दोन मुलांची आई आहे. तिचे आणि गावातील एका पुरुषाचे विवाहबाह्य संबंध होते. या संबंधांची गेले काही दिवस गावात चर्चा होती. त्यामुळे कुटुंबिय नाराज होते. तसेच, दोघांवर चिडलेही होते. युगुलातीतल महिला आणि पुरुषाला त्यांच्या नातेवाईकांनी असे न वागण्याबद्दल समजावलेही होते. तरीही त्यांचे प्रेमसंबंध सुरुच होते. रविवारी (२ डिसेंबर) ही महिला अचानक संबंधीत पुरुष व्यक्तिच्या घरी आली. तसेच, तिने आम्हाला पती-पत्नीप्रमाणे सोबत राहायचे आहे, असे सांगायला सुरुवात केली. महिलेल्या या पवित्र्यामुळे पुरुषाच्या घरात वाद सुरु झाला. वाद विकोपाला गेला. त्यामुळे पुरुषाच्या घरातील मोठा भाऊ, धाकटा भाऊ आणि त्यांची पत्नी, वडील अशा सर्वांनी मिळून तो व्यक्ती आणि ती महिला यांना रिक्षात बसवले आणि त्यांची गावातून धिंड काढली.

दरम्यान, घडल्या प्रकाराबद्दल संबंधीत पुरुषाने आढ्याळ पोलिसांत तक्रार दिली आहे. पुरुषाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलीसांनी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.