भारतीय लोकशाही आणि देशातील धर्मनिरपक्षतेवर घाला घालणारे केंद्र सरकारचे नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणल्याचं सांगत सध्या देशभर वातावरण तापले आहे. दरम्यान मुंबई, नागपूर, मालेगाव, अहमदनगर, औरंगाबादसह राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे, आंदोलनं काढण्यात आली आहे. आज औरंगाबादमध्ये एमआयएम (AIMIM) पक्षानेदेखील आंदोलनाला सुरूवात केली आहे. नमाज अदा केल्यानंतर औरंगाबादमध्येही नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान पोलिसांनी शांत रहा हिंसाचार करू नका असं आवाहन करण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा चालणार आहे. Citizenship Amendment Bill सरकारची कसोटी पाहणारं नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक नेमकंं आहे काय?
दरम्यान काल (19 डिसेंबर) मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात मोठ्या प्रमाणात आंदोलक एकत्र जमले होते. त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाले आहेत. दरम्यान नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनादरम्यान सुरू आहे. मुंबईमध्ये सामान्यांसोबतच कलाकार मंडळीदेखील रस्त्यावर उतरले होते.
महाराष्ट्रात नागरिकत्त्व कायद्याविरोधात निदर्शन
Maharashtra: Protest outside Hari Masjid in Mumbai, against #CitizenshipAmendmentAct and National Register of Citizens (NRC). pic.twitter.com/n7pq3RmRFE
— ANI (@ANI) December 20, 2019
आज सकाळी मालेगावातही नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात नागरिकांनी उत्स्फुर्त रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत हजारो लोक सहभागी झाले होते. दरम्यान आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या आहेत. मात्र नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीच्या विरोधात निघालेला भव्य मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला आहे.
नागपूरमध्येही भारतीय मुस्लिम परिषदेने नागरिकत्व कायद्याविरोधात रॅलीचं आयोजन केले होते.