निकालावर नाराजी व्यक्त करत वकिलाने न्यायमूर्तींच्या कानाखाली लगावली
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

न्यायमूर्तींच्या निकालावर नाराजी व्यक्त करत वकिलाने त्यांच्या कानाखाली लगावल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे. तर पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु करण्यात आला असून अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.

नागपुरातील वकील डी. एम. पराते यांनी सत्र न्यायमूर्तींच्या कानाखाली लगावली असल्याचा प्रकार घडला आहे. तर न्यायमूर्ती के. आर. देशपांडे यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली. या घटनेचा तपास करताना पोलिसांना असे कळले की, पराते यांना न्यायमूर्ती देशपांडे यांनी दिलेला निकाल पटला नसल्याचे असे कृत्य केल्याचे सत्य समोर आले आहे.

त्यामुळे सरकारी अधिवक्ते नितीन तेलगोटे यांनी या घटनेचा निषेध जाहीर केला. तसेच वकिलांकडून न्यायमूर्तींसाठी असे वागणे योग्य नसल्याचे ही मतं स्पष्ट केलं आहे.