Shirdi Sai Baba Mandir (Photo Credit: Wikimedia Commons )

Saibaba Birthplace Row: मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात संत साईबाबा यांच्या जन्मस्थळावरून वाद निर्माण झाला आहे.काही दिवसांपूर्वी, परभणीमध्ये असलेले पाथरी (Pathri) हे गावच साईबाबा याचं जन्मस्थळ असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. तसेच सेलूचे संत श्री केशवराज बाबासाहेब महाराज हे साईबाबांचे गुरू आहेत हे सिद्ध झालं असताना देखील त्यासंबंधित वाद अजूनही सुरू आहे.

या संपूर्ण वादाबद्दल 24 जानेवारी रोजी शिवसेनेचे तालुकाप्रमुख काशीनाथ घुमरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली होती. या भेटीदरम्यान, काशीनाथ घुमरे यांनी उद्धव ठाकरे यांनी उपलब्ध असलेले 100 पानांचे विविध पुरावे सादर केले व साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीच असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांना विनंती केली की त्यांनी पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ व सेलू हे गुरूस्थळ आहे असे जाहीर करावे.

पुढे ते मुख्यमंत्र्यांना असंही म्हणाले की साईबाबा यांनी सेलू येथील केशवराज बाबासाहेब महाराज यांना आपले गुरू मानून तिथे वास्तव्य केले होते.

साईबाबा जन्मस्थळाच्या वादात बीडकरांचीही उडी; साईबाबा बीडमध्ये नोकरी करत असल्याचा दावा करत तीर्थक्षेत्रासाठी मागितला 100 कोटींचा निधी

त्यामुळे लवकरच या वादावर पडदा पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता मुख्यमंत्री याबद्दल काही घोषणा करणार का हे बघणं महत्त्वाचं ठरेल.