File image of Priya Dutt, Raj Babbar, Sushil Kumar Shinde | (Photo Credits: ANI)

List of Congress Candidates For Loksabha polls 2019:  भारताच्या 17 व्या लोकसभा निवडणूकीच्या तारखा (Lok Sabha Election 2019) काही दिवसांपूर्वी घोषित करण्यात आल्या आहेत. देशात सात टप्प्यांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यात या निवडणूका पार पडणार आहेत. याकरिता सार्‍याच पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरूवात केली आहे. कॉंग्रेसने लोकसभा निवडणूक 2019 साठी दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच मतदारसंघातील उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी यंदा लोकसभा निवडणूक लढणार नाही असं म्हणणार्‍या प्रिया दत्त यांचे नावदेखील जाहीर झाले आहे. त्यासोबतच सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde), मिलिंद देवरा (Milindd Deora), नामदेव उसेंड (Dr Namdev Usendi) ,नाना पटोले (Nana Patole ) यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.

कॉंग्रेसची दुसरी मतदार यादी

 महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे पाच उमेदवार 

नागपूर - नाना पटोले

गडचिरोली-नामदेव उसेंडी

मुंबई उत्तर-प्रिया दत्त

मुंबई दक्षिण- मिलिंद देवरा

सोलापूर- सुशीलकुमार शिंदे

11,18,23 आणि 29 एप्रिल यादिवशी महाराष्ट्रामध्ये निवडणूक होणार आहे. तर देशभरातील निवडणुकीचा निकाल 23 मे 2019 दिवशी लागणार आहे.