File image of PM Narendra Modi (Photo Credits: PIB)

पंडीत दीनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आज मुंबई मध्ये मास्टर दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान, मंगेशकर कुटुंबीय, हृदयेश आर्ट्सने मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा 80वा स्मृती सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उपस्थित राहणार आहेत. नरेंद्र मोदी यांना 'लता दीनानाथ मंगेशकर' ( Lata Deenanath Mangeshkar Award) पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. हा पुरस्कार जाहीर झालेले ते पहिले मानकरी आहेत.  गायिका लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ हा पुरस्कार या वर्षांपासून दिला जात आहे.

सायनच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडणार्‍या या सोहळ्यामध्ये संपूर्ण मंगेशकर कुटुंब हजर राहणार आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच हा सोहळा होत आहे. दरवर्षी संगीत, नाटक, कला आदी क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार जाहीर करून कलाकारांचा गौरव केला जातो.

यंदा नरेंद्र मोदींना लता मंगेशकर पुरस्कार तर संगीत क्षेत्रासाठीतील मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार गायक राहुल देशपांडे यांना, चित्रपट सेवेसाठीचा मास्टर दीनानाथ विशेष पुरस्कार आशा पारेख आणि जॅकी श्रॉफ यांना, मास्टर दीनानाथ आनंदमयी हा समाजसेवेसाठीचा पुरस्कार मुंबईचे डबेवाले (नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट) आणि सर्वोत्कृष्ट नाटकासाठी पुरस्कार संज्या छाया नाटकाला जाहीर करण्यात आला आहे. हे देखील नक्की वाचा: Hanuman Chalisa Row In Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौर्‍यात विघ्न नकोचं कारण सांगत राणा दाम्पत्यांचं आंदोलन मागे; आमदार रवी राणा यांंची घोषणा .

मुंबई मध्ये आज संध्याकाळी होणार्‍या या सोहळ्याच्या पार्श्वभूमीमवर व्हीआयपींची ये-जा पाहता पश्चिम द्रुतगती मार्गावर ट्राफिक जॅमची शक्यता वर्तवली जात आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वरून धारावी, माटूंगा कडे येणारी वाहतूक मंदगतीने पुढे सरकण्याची  शक्यता असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन ट्राफिक विभागाकडून करण्यात आले आहे.