Rainfall | Image used for Representational purpose only | (Photo Credits: PTI)

Pre Monsoon Rain In Mumbai: मागील काही दिवसांपासून उन्हाळ्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना आज रविवारच्या रात्री(9 जून) थोडा दिलासा मिळाला आहे. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आज मान्सूनपूर्व (Pre Monsoon Rain) सरी बरसत आहेत. पावासाच्या सोबतीने गडगडाट आणि वीजेचा कडकडाटही पहायला मिळत आहे. अरबी समुद्रात कमी दाब्याच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळाची शक्यता; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन

मुंबईमध्ये मुलूंड, मानखुर्द, चेंबूर, सायन भागामध्ये मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान वीजेचा कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने मुलुंड परिसरात काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्याचे वृत्त आहे.

आज महाराष्ट्रात औरंगाबाद, नाशिक भागातही पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईमध्ये बरसलेल्या पावसाच्या सरींमुळे मातीचा गंध वातावरणामध्ये पसरला आहे.