मुंबई- पुणे (Mumbai - Pune Rail) दरम्यान धावणारी रेल्वे सेवा मागील काही दिवसांपासून तांत्रिक कामामुळे ठप्प करण्यात आली होती. मात्र आता 11 नोव्हेंबरपासून ही सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात आली आहे. खंडाळ्याजवळ दुरूस्तीचं काम या काळात पूर्ण करण्यात आले आहेत.
दरम्यान यंदा राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यावेळेस अनेकदा दरड कोसळल्या होत्या. त्यामुळे मालगाडी रूळावरून घसरण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे मंकी हिल भागात घाटात लोहमार्ग मजबुती करण आणि विविध तांत्रिक कामं हाती घेण्यासाठी विशिष्ट टप्प्यांत गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. आता रेल्वे प्रशासनाकडून काम पूर्ण करण्यात आलं आहेत.
मागील दोन महिन्यांपासून प्रगती एक्सप्रेस मागील काही दिवसांपासून ट्प्या टप्प्यामध्ये बंद ठेवण्यात आली होती. त्याप्रमाणे मुंबईच्या 6 गाड्या पुण्यातून सोडण्यात आल्या आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रगती एक्सप्रेस 11 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरळीत केली जाणार आहे. पुणे- डेक्कन क्वीन एक्सप्रेस 10 नोव्हेंबर पर्यंत कर्जत स्थानकावरही थांबवली जात होती. आता हळू हळू टप्प्या टप्प्याने मुंबई पुणे रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.