Power Cut In Kalyan-Dombivali: आज आणि उद्या कल्याण, डोंबिवली भागात सहा तासांसाठी वीजपुरवठा असेल बंद
Representational Image (Photo credits: PTI)

आज कल्याण पूर्व (Kalyan East) आणि डोंबिवली (Dombivali) भागामध्ये सकाळी 10 ते दुपारी 4 या सहा तासांसाठी काही भागात वीजपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. देखभालीच्या कामासाठी हा वीजपुरवठा खंडीत केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आज 20 एप्रिल आणि उद्या 21 एप्रिल अशा दोन दिवशी हे काम होणार असल्याने नागरिकांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे. हे देखील नक्की वाचा: राज्यातील भारनियमन होणार कमी; विजेची मागणी पुरवण्यासाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय .

डोंबिवली मध्ये कोणत्या भागात वीजपुरवठा खंडीत असणार?

डोंबिवली मध्ये रामनगर फिडरवरील रामनगर पोलिस ठाणे, केळकर रोड, राजाजी रोड, क्रांतीनगर, मद्रासी मंदिर, म्हात्रेनगर, नवीन आयरे रोड, आयरे गाव या भागात आज (20 एप्रिल) वीजपुरवठा खंडित असेल. दत्तनगर फिडरवरील स्वामी शाळा, कॉमर्स प्लाझा, टिपटॉप कॉर्नर, जुना आयरे रोड, फाटकवाडी, दत्तनगर, संगीतावाडी, दत्त चौक, शिवमंदिर रोड, डीएनसी कॉलेज, नांदिवली रोड आणि तुकारामनगर फिडरवरील आयरे रोड, तुकारामनगर, सुदामवाडी, आयरेनगर, पाटकर शाळा या भागांत गुरुवारी (21 एप्रिल) वीज पुरवठा खंडीत असणार आहे.

कल्याण मध्ये कोणत्या भागात वीजपुरवठा खंडीत असेल?

कल्याण पूर्वमधील आजदे फिडरवरील आजदे, पाथर्ली, सागर्ली, एमआयडीसी कॉलनी, आजदेपाडा, जिमखाना रोड, शेलारनाका, इंदिरानगर झोपडपट्टी, रेल्वे कॉलनी, त्रिमूर्तीनगर झोपडपट्टी भागात बुधवारी, 20 एप्रिल दिवशी वीज खंडीत असणार आहे. तर २२ केव्ही टेम्पोनाका फिडर, २२ केव्ही एमआयडीसी फिडर क्रमांक ११वरील एमआयडीसी फेज-२मधील अंशत: काही भागां गुरुवारी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत चा वीजपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

MSEDCL च्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर काम वेळेत पूर्ण झाले तर संध्याकाळी 4 पूर्वी देखील वीजपुरवठा पूर्ववत केला जाऊ शकतो.