Mumbai on High Alert: मुंबई मध्ये दहशतवादी हल्ला शक्यतेच्या पार्श्वभूमीवर Drones उडवण्यावर बंदी
Mumbai | Photo Credits: Pixabay.com

Drones Ban in Mumbai: मुंबई शहरामध्ये दहशतवादी हल्ला (Terror Attack) होण्याच्या शक्यतेवर आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police)  एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भारतातील आगामी सणासुदीचा काळ पाहता लोकांची खरेदीसाठी त्याच्या अनुषंगाने आता मुंबई शहरात ड्रोन्स (Drones)  आणि अन्य फ्लाईंग ऑब्जेक्ट्सवर बंदी घालण्यात आली आहे. मुंबई मध्ये आता 28 नोव्हेंबर पर्यंत छोटे ड्रोन देखील उडवले जाऊ शकत नाहीत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार गुप्तचर संघटनांकडून मिळालेल्या माहितीनंतर मुंबई मध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकतो. या अलर्टनंतर सावधगिरीचा पवित्रा घेत 30 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर या काळात ड्रोन किंवा अन्य फ्लाईंग ऑब्जेक्ट्स उडवण्यावर बंदी असेल. तसेच ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था देखील चोख केली जाणार आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कलम 188 च्या अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

ANI Tweet

भारतामध्ये सर्वत्र सध्या कोरोना लॉकडाऊन आहे. हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामध्ये नागरिकांना विशिष्ट नियमांचं पालन करत बाहेर पडण्यास मुभा आहे. परंतू नागरिकांना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक आहे. मुंबई मध्ये सध्या कलम 144 देखील लागू आहे. यामध्ये अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्य काही गोष्टींसाठी गर्दी होऊ शकते. या गर्दीला ड्रोनच्या माध्यमातून लक्ष्य केले जाऊ शकते.

पाकिस्तानमध्ये पेशावर आज ब्लास्टने हादरलं आहे. दीर कॉलनी मदरशा मध्ये झालेल्या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला असून 70 पेक्षा अधिक लोकं जखमी आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या मध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे.