Pooja Chavan Suicide Case: वनमंत्री संजय राठोड यांच्या स्वागताला तोबा गर्दी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अवाहनाचा पोहरादेवी येथे फज्जा
Sanjay Rathore | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कोणत्याही स्थितीमध्ये गर्दी टाळाच असे कळकळीचे अवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केले आहे. या अहवाहनाचा त्यांच्याच मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या शिवसेना (Shiv Sena) नेत्यामुळे फज्जा उडल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राठोड (Sanjay Rathore) असे या मंत्र्याचे नाव आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात गेले प्रदीर्घ काळ संपर्क कक्षेच्या बाहेर होते. आज ते पोहरादेवी (Poharadevi ) येथे भेट देत आहेत. या वेळी संजय राठोड यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक आणि त्यांच्या समाजाच्या कार्यकर्त्यांनी तोबा तोबा गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.

सोशल डिस्टंन्सींगचा फज्जा

संजय राठोड यांच्या स्वागतासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रचंड प्रमाणावर जनसमुदाय पोहरादेवी येथे जमला आहे. त्यामुळे कोरोना काळातील नियम आणि सोशल डिस्टन्सींग यांचा फज्जाच उडाला आहे. अनेक लोकांनी मास्क लावले नाहीत. गर्दीत लहान मुले आणि महिलांचाही समावेश मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी पारंपरिक लोककलाही सादर केल्या जात आहेत. (हेही वाचा, Sanjay Rathod at Poharadevi Temple: संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे सपत्नीक घेतले सेवालाल महाराजांचे दर्शन)

मुख्यमंत्र्यांचे अवाहन काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (21 फेब्रुवारी) सायंकाळी राज्यातील जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात कोरोना व्हायरस संसर्ग टाळण्यासाठी तसेच, राज्यात पुन्हा लॉकडाऊन टाळण्यासाठी नागरिकांनी जबाबदारी घेणे महत्त्वाचे आहे. नागरिकांनी कोणत्याही स्थितीमध्ये नागरिकांनी गर्दी टाळायला हवी. मस्कचा वापर ढालीप्रमाणे करायला हवा. कोरोनाचा घाव चुकविण्यासाठी मास्क महत्त्वाचा आहे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. (हेही वाचा, Pooja Chavan Suicide Case: नॉट रिचेबल वनमंत्री संजय राठोड आज पोहरादेवी मंदिरात प्रकटण्याची शक्यता, जाणून घ्या कार्यक्रम)

पूजा चव्हाण आत्महत्या या हायहोल्टेज प्रकरणाच्या चर्चेनंतर वनमंत्री पोहरादेवी येथे येणार आहेत. त्यामुळे पोलिसांनी पोहरादेवी मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. वनमंत्री राठोड आणि त्यांची समाजात असलेली लोकप्रियता, समाजाचे आणि पक्षाचे कार्यकर्ते आदींमुळे या परिसरात गर्दी होण्याची शक्यता गृहित धरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस तैनात करण्यात आल आहेत. मुख्य रस्त्यावर बॅरीकेट्स लावण्यात आले आहेत. या परिसरात बॉम्बशोधक पथकही दाखल झाले आहे. मात्र, असे असले तरी सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाला तो उडालाच.