सोसायटीतील महिलांसमोर विवस्त्र होऊन येणाऱ्या पोलीस हवालदाराला मिळाला जामीन, चौकशी करून घेणार निर्णय
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईतील नेहरू नगर (Neharu Nagar) परिसरात मागील दहा वर्षांपासून राहणाऱ्या हरिश्चंद्र लहाने (Harishchandra Lahane) या पोलीस हवालदारावर बिल्डिंगच्या बाल्कनी मध्ये विवस्त्र आल्याचा आरोप बिल्डिंग मधील काही महिलांनी केला होता. याप्रकरणी हवालदाराला तूर्तास जमीन देण्यात आला असून पोलीसांच्या विभागीय चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

मागील आठवड्यात, बिल्डिंगच्या बाल्कनी मध्ये काही रहिवाशी महिला बसलेल्या असताना हरिश्चंद्र लहाने तिथे आला आणि त्यांनी या महिलांना अर्वाच्य शिवीगाळ करायला सुरवात केली त्यानंतर लहाने आपल्या घरात गेला आणि काही वेळाने नग्न होऊन घराबाहेर आला असा आरोप महिलांनी केला आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी विलाश शिंदे यांनी माध्यमांना दिली. यासंदर्भात लहाने यांच्यावर आयपीसी अंतर्गत कलम 354 (A) (आक्षेपार्ह्य अश्लील इशारा करणे) व कलम 509 अंतर्गत महिलांप्रती चुकीचे वर्तन करून लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुंबई: ATM मध्ये तरुणीला प्रायव्हेट पार्ट दाखवून आक्षेपार्ह चाळे, व्यक्तीला व्हिडिओच्या माध्यमातून अटक

या पूर्वी मुलुंड परिसरात देखील एका अज्ञात तरुणाने एटीएम मध्ये तरुणीला प्रायव्हेट पार्ट दाखवून अश्लील इशारा केल्याचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता यावरून महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिला आहे. हवलदार लहाने हे सध्या जामीनावर असून काहीच दिवसात आंतरविभागीय चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.