Vardha News: वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथील घाडगे जवळच्या वाघोडा येथे फॉर्म हाऊसमध्ये पोलिसांनी छापा टाकला आहे. 25 डिसेंबर रोजी सशस्त्र दरोडा पडला होता. ज्यामध्ये दरोडेखोरांनी फार्म हाऊसच्या एका खोलीत तिघांना डांबून 55 पोते सोयाबीन, सोन्याचा ऐवज असा 1 लाख 94 हजारांचा मुद्देमाल दरोडांनी पळवला होता. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केले. गुन्हा वापरत असलेले वाहन देखील जप्त केले. हेही वाचा-एटीएसचा छापा पडल्याने अटक टाळण्यासाठी तरुणाची पाचव्या मजल्यावरून उडी,
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस स्थानिक गुन्हेगारी शाखेने ही कारवाई केली. सागर रतन पवार (38), दीपक रतन पवार (32) दोन्ही रा. चांदुर रेल्वे, मनोज अशोक पवार (32) रा. तरोडा, ता. चांदुर रेल्वे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दरोड्यांनी पालिवाल कुटुंबातील घरावर दरोडा टाकला. घरातील सर्वांना त्रास देत त्यांच्याकडून सोनं हिसकावून घेतल. पालिवाल कुटुंबियांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतल्यानंतर अॅक्शन मोडवर आले. कारंजा पोलिसांकडून संयुक्तरित्या तपास सुरु झाला.
पोलिसांनी एकेक आरोपींना ताब्यात घेतले. सागर याला अकोला रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले. दीपक रतन पवार (वय 32), दोन्ही रा. शिवाजी नगर, चांदुर रेल्वे, जि. अमरावती यास धारणी ते परतवाडा रोडवरील आर.टी.ओ. टोल नाका येथे नाकाबंदी करून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. मनोजला अमरावती रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून एका कार देखील जप्त केली.