मुंबई लोकल ट्रेन (Photo Credits: PTI)

आज सकाळी पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला धमकीचा फोन आला. मुंबईतील लोकल ट्रेनममध्ये लवकरच साखळी बॉम्बस्फोट होणार, अशी धमकी फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली. इतकंच नाही तर, आपण लोकलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचं या व्यक्तीने सांगितलं. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मुंबई पोलिस सतर्क झाले असून फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आज सकाळच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. दरम्यान फोन नंबर ट्रेस करुन मुंबई पोलिसांनी आरोपीला दोन तासातच अटक केली आहे.  (हेही वाचा - Pune: खंडणी प्रकरणी UPSC च्या उमेदवाराला अटक; सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण होण्याआधीचं भंगल)

यावेळी नियंत्रण कक्षात असेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने बॉम्ब कुठे ठेवला कधी ठेवला अशी चौकशी केली. त्यावर संबधित व्यक्तीने कोणतंही उत्तर दिलं नाही. मात्र, त्याने कुर्ला, ठाणे, कल्याण टिळकनगर अशी वेगवेगळी ठिकाणं सांगितली. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण जुहू विलेपार्ले परिसरातून बोलत असल्याचे सांगितले.

पोलिसांनी अधिक तपास केला असता या व्यक्तीने जुहूच्या शाह हाऊस मोरगांव येथून फोन केल्याचं समजले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी संबधित स्थानकावरील सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याबाबत कळवले आहे. दरम्यान, कुणीही घाबरून जाऊ नये, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.