Sanjay Raut | (Photo Credits: ANI/X)

शिवेसना खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून (Mumbai Police EOW) क्लीन चीट मिळाल्याची माहिती समोर आली आहे.  जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईओडब्ल्यूकडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर केल्याची माहिती आहे.  मुंबई महानगरपालिकेकडून दाखल झालेली तक्रार गैरसमजातून केल्याचा दावा करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यावरून राजकारण पेटलंय. तर सरकार दाऊद इब्राहिमलाही क्लीनचिट देईल, असा टोला संजय राऊतांनी लगावलाय. एवढंच नाही तर विरोधी पक्षातील लोक सत्तेच्या आश्रयाला गेल्यास त्यांना क्लीनचिट मिळत असल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. (हेही वाचा - Rashmi Shukla Hospitalised: राज्याच्या महासंचालक रश्मी शुक्ला रुग्णालयात दाखल, उपचार सुरु)

लोकसभा निवडणूकीआधीच रवींद्र वायकरांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि कथित जोगेश्वरी भुखंड घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने वायकरांना क्लीनचिट दिलीय. तर मुंबई महापालिकेकडून वायकरांविरोधात दाखल झालेली तक्रार गैरसमजातून झाल्याचंही आर्थिक गुन्हे शाखेने म्हटलंय. यावरूनच संजय राऊतांनी सरकारवर जोरदार टिका केली आहे.

दरम्यान भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. रवींद्र वायकर यांची ईडीकडून चौकशी देखील करण्यात आली होती. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना पत्रकारांनी रवींद्र वायकर यांच्या क्लीन चीट बद्दल विचारल असता त्यांनी  हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं त्यामुळे या विषयावरती मी काही बोलणार नाही, असं म्हटलं.