सिंहगड रोडवर पाणीच पाणी | (छायाचित्र सौजन्य सोशल मीडिया)

पाणीटंचाईमुळे पाणीकपातीची टांगती तलवार डोक्यावर लटकत असतानाही त्याचे पालिका प्रशानास त्याचे काहीही सोयरसुतक नल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. पुण्यातील सिंहगड रस्ता (Sinhagad Road), नवशा मारुती (Navshya Maruti Area) -चुनाभट्टीजवळील परिसर गुरुवारी अचानकच जलमय झाला. परिसरातील रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळाले. पाणी पातळी चार फूट उंचीला पोहोचल्याने आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरले. तर वाहनचालकांचीही अडचण झाली. पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील (Pmc Water Tank) रॉ- वॉटर व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, पुणेकरांच्या बेसुमार पाणीवापराला चाप लावण्यासाठी जलसंपादा विभागाने कडक पावले टाकली आहेत. त्यामुळे शहरवासीयांवर पाणीकपातीची तलवार टांगती आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याचे योग्य व्यवस्थापण करणे गरजेचे आहे. मात्र, पालिका प्रशासनाकडून ते होत नाही. गुरुवारीही असाच प्रकार पाहायला मिळाला. दुरुस्तीच्या आणि इतर काही कारणास्तव जलसंपदा विभागाने महापालिकेचे दोन पंप बुधवारी दुपारी तीन वाजता बंद केले होते. बंद केलेले हे दोन पंप पर्वती जलकेंद्राला पाणी पुरवठा करण्यासाठी वापरले जातात. (हेही वाचा, व्हिडिओ: पुणेकरांच काही खरं नाही, आगोदर होर्डिंग, आता थेट मेट्रोची भलीमोठी ड्रील मशीन भररस्त्यात कोसळली)

दरम्यान, पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील रॉ- वॉटर व्हॉल्व्ह गुरुवारी सकाळी अचानक नादुरुस्त झाले. त्यामुळे हे पाणी थेट रस्त्यावर आले. सलग दोन तास पाणी वाहात राहिल्याने रस्त्यांवरील काही भागांमध्ये चार फूट पाणी साचले होते. यात लाखो लिटर पाणी वाया गेले. गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यासाठी खडकवासला ते पर्वतीपर्यंत येणाऱ्या सुमारे 1600 मीमी व्यासाच्या जलवाहिनीचा व्हॉल्व महापालिका कर्मचारी बंद करत होते. मात्र, अचानकपणे त्यात बिघाड झाला आणि रस्त्यावर पाणी धो धो वाहू लागले. पू. ल देशपांडे उद्यानाच्या समोर हे पाणी रस्त्यावर आले. वापराशीवाय लाखो लिटर पाणी वाया गेल्याने पुणेकर हळहळ व्यक्त करत आहेत.