पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेची (Punjab and Maharashtra Cooperative)फसवणूक (Cheating Case) केल्याप्रकरणी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस (Joy Thomas) यांना 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (Enforcement Directorate) शुक्रवारी त्यांना अटक केली. आर्थिक गुन्हे शाखेने थॉमस यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यावेळीच थॉमस यांना अटक करण्यात आली.
जॉय थॉमस यांनी 6 हजार 500 कोटींची फसवणूक केली आहे, असे आर्थिक गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले आहे. याप्रकरणी थॉमस यांची 3 हजार 500 कोट्यावधींची संपतीदेखील जप्त केली आहे. थॉमस यांच्यासह पीएमसी बॅंकेचे संचालक सारंग आणि राकेश वाधवान यांनाही आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. राकेश आणि सारंग याच्या विरोधात लुकआउट सर्कुलर जाहीर केले आहे. तसेच सरकारने इमिग्रेशन ऑथॉरिटी यांना या दोघांवर लक्ष ठेवण्याचे निर्देशन दिले होते.
पीएमसी प्रकरण नेमक काय आहे?
पीएमसीकडून एचडीआयएलला कर्ज देण्यात आले होते. मात्र एचडीआयएलने कर्जाची रक्कम वेळेत न भरल्याने पीएमसी बँक आणि बँकेतील खातेदार आता अडचणीत आले आहेत. बँकेला 4355.43 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याबद्दल हा एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तसेच बँकेमधील कर्जाची माहिती लपवण्यासाठी तब्बल 21 हजार बनावट खाती उघडण्यात आले होते.
पीएमसी बॅंकेतील खातेदारांना याचा मोठा फटका बसला आहे. या बॅंकेच्या खातेदारांनी काही दिवसापूर्वी संबधित बॅंकेसमोर गर्दी केली होती. यानंतर खातेदारांना दिवसाला हजार रुपये काढण्याची मर्यादा करण्यात आली होती. परंतु ही मर्यादा वाढवून आता खातेदाराला एका दिवसासाठी किंवा 6 महिन्यांसाठी 25 हजारांपर्यंत रक्कम काढता येणार आहे.