अवधूत वाघ आणि नरेंद्र मोदी (Photo Credit : Facebook)

नरेंद्र मोदी हे विष्णूचा 11 वा अवतार असल्याचे भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी म्हटले आहे. काही वेळापूर्वी त्यांनी असे ट्वीट केले आहे. हिंदू संस्कृतीत 33 कोटी देव असून पंचमहाभुतं आहेत. भारतमातेला आपण देवता मानतो. त्याचप्रमाणे देशाचे प्रधानसेवक नरेंद्र मोदी हे भारतमातेची सेवा करतात. म्हणूनच ते आमच्यासाठी देवासारखे असल्याचे वाघ यांनी म्हटले आहे. याच भावनेपोटी त्यांनी नरेंद्र मोदींना विष्णूचा 11 वा अवतार असल्याचे म्हटलं आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रभू रामचंद्राने, कृष्णाने जगाच्या कल्याणासाठी जन्म घेतला होता. तसेच नरेंद्र मोदी आमच्यासाठी देवच आहेत. सगळ्यांसाठी चांगलं काम करणाऱ्या मोदींना आम्ही देवच मानतो आणि त्यात काहीही गैर नसल्याचे वाघांनी म्हटले आहे.

आम्हाला मोदी भक्त म्हटलं जात अंध भक्त नाही. त्यामुळेच मी जे काही बोललो ते त्या माझ्या मनातील भावनेपोटीच, असे स्पष्टीकरणही वाघ यांनी दिले.