
गुढी पाडवा उत्सवादरम्यान स्मृती मंदिरात आरएसएस संस्थापक नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. हिंदू नववर्षानिमित्त होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिपदा कार्यक्रमाचे औचित्य साधत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मृती मंदिर येथे दर्शन घेतले आणि संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हजारो अनुयायांसह 1956 मध्ये ज्या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्या दीक्षाभूमीला भेट देऊन पंतप्रधान आदरांजली वाहतील.
पंतप्रधान मोदी सकाळी नऊ वाजता नागपुरात पोहोचले. यावेळी नागपूर विमानतळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. संघाच्या शताब्दी वर्षात पंतप्रधान मोदींची संघ मुख्यालयाला भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. (हेही वाचा: Gudi Padwa 2025 Wishes: गुढी पाडव्यानिमित्त पीएम नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, अजित पवार, शरद पवारसह अनेक नेत्यांनी दिल्या हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा)
PM Narendra Modi in Nagpur:
#WATCH | Maharashtra | PM Narendra Modi pays floral tribute to RSS founder Keshav Baliram Hedgewar at RSS' Smruti Mandir in Nagpur
RSS chief Mohan Bhagwat is also present
(Source -ANI/DD) pic.twitter.com/6gV2kfXyrK
— ANI (@ANI) March 30, 2025
पंतप्रधान माधव नेत्रालय नेत्र चिकित्सा आणि संशोधन केंद्राच्या नवीन विस्तारित इमारतीची म्हणजे माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची पायाभरणी करतील. 2014 मध्ये स्थापन झालेले हे नेत्रालय नागपूरमधील एक प्रमुख सुपर-स्पेशालिटी नेत्ररोग सेवा सुविधा केंद्र आहे. गुरुजी माधवराव सदाशिवराव गोळवलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही संस्था स्थापन करण्यात आली. आगामी प्रकल्पात 250 खाटांचे रुग्णालय, 14 बाह्यरुग्ण विभाग (OPD) आणि 14 मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर असतील. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आणि जागतिक दर्जाच्या नेत्ररोग संबंधित सेवा प्रदान करणे आहे, हा यामागील उद्देश आहे.
पंतप्रधान नागपुरातील सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या दारूगोळा केंद्राला भेट देणार आहेत. नि:शस्त्र हवाई वाहनांसाठी (UAVs) नव्याने बांधण्यात आलेल्या 1250 मीटर लांब आणि 25 मीटर रुंद हवाई पट्टीचे आणि लोइटरिंग युद्धसामग्री आणि इतर मार्गदर्शित युद्धसामग्रीची चाचणी घेण्यासाठी प्रत्यक्ष युद्धसामग्री आणि वॉरहेड चाचणी सुविधेचे उद्घाटन करतील. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून संवैधानिक पदे भूषवत असताना नरेंद्र मोदी संघाच्या मुख्यालयाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ असेल. संघाचे म्हणणे आहे की, यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती.