Bombay High Court | (Photo Credits: ANI)

विशाळगडावर (Vishalgad) घडलेल्या हिंसक घटनांवर आज मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) एक तातडीची सुनावणी झाली आहे. यामध्ये अतिक्रमणांपासून (Structures' Demolition) वाचवण्यासाठी काही संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनेचे पडसाद कोर्टात पोहचले. कोल्हापूरच्या अधिकाऱ्यांना विशाळगडावरील बांधकामं पाडण्यापासून मज्जाव करण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. कोर्टात आज सुनावणीमध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत कुठलीही नवी तोडक कारवाई करू नका असं सांगण्यात आले आहे. न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुन्नीवाला यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली आहे. सध्या पावसाच्या दिवसात ही तोडक कारवाई तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विशाळगडावरील अतिक्रमणं हटवण्याची मोहीम स्थानिक प्रशासनानं हाती घेतली होती. या संघटनांकडून 'चलो विशाळगड', 'विशाळगड बचाव' मोहीम राबवली. या मोहिमेला आणि आंदोलनाला मात्र हिंसक वळण लागल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. सध्या पावसाच्या दिवसात तिथल्या बांधकामावर हातोडा चालवण्याची काय गरज होती? असा प्रश्न मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला विचारला आहे.

विशाळगडावरील कारवाई नंतर राज्यात अनेकांनी तेथे भेट दिली होती. विजय वड्डेटीवार, खासदार शाहू महाराज यांनीही विशाळगडाला भेट दिली होती. Kolhapur MP Shahu Maharaj Viral Video: अन् पावसात भिजणाऱ्या नुकसानग्रस्त चिमुकलीला खासदार शाहू महाराजांनी दिलं स्वतःचं जॅकेट (Watch Video).

विशाळगडचे रहिवासी अयुब उस्मान कागदी, अब्दुलसलीम कासिम मलंग आणि मुराद म्हालदार यांनी दाखल केलेल्या याचिकेत दावा केला आहे की, माजी खासदार आणि 2,500 उजव्या कार्यकर्त्यांच्या जमावाने केलेल्या दबावाखाली गुंडांच्या तुकडीला पोलिसांनी गडावर जाण्याची परवानगी दिली होती. याचिकेत दावा केला आहे की कथित गुंडांनी 14 जुलै रोजी लोखंडी रॉड आणि हातोड्याने सशस्त्र होते आणि रहिवाशांवर हल्ला केला आणि दगडफेक केली.