Kolhapur MP Shahu Maharaj Viral Video: अन् पावसात भिजणाऱ्या नुकसानग्रस्त चिमुकलीला खासदार शाहू महाराजांनी दिलं स्वतःचं जॅकेट (Watch Video)
दंगलग्रस्त भागातील लोकांना भेट देताना संसार उघड्यावर पडलेल्या काही कुटुंबंना भेटताना एकीकडे कपडेही नसल्याचं त्यांना स्थानिकांनी सांगताच त्यांनी आपले जॅकेट काढून मुलीला घातले.
14 जुलै रोजी महाराष्ट्रातील कोल्हापुरातील विशालगड किल्ल्यावर दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष झाला. यानंतर मंगळवारी कोल्हापूरचे काँग्रेस खासदार शाहू महाराज यांनी विशालगड किल्ल्याभोवती वसलेल्या गावाला भेट दिली. यावेळी, दंगलग्रस्त भागातील लोकांना भेट देताना संसार उघड्यावर पडलेल्या काही कुटुंबंना भेटताना एकीकडे कपडेही नसल्याचं त्यांना स्थानिकांनी सांगताच त्यांनी आपले जॅकेट काढून मुलीला घातले. याचा एक व्हिडिओही समोर आला असून तो सध्या सोशल मीडीयात वायरल होत आहे.
खासदार शाहू महाराजांनी चिमुकलीला घातलं स्वतःचं जॅकेट
Shahu Maharaj Kolhapur : विशाळगडावर चिमुकलीला वाजली थंडी, शाहू महाराजांनी दिलं स्वतःचं जॅकेट#ShahuMaharaj #Kolhapur pic.twitter.com/CGBN3Nxw2O
— ABP माझा (@abpmajhatv) July 16, 2024
(The above story first appeared on LatestLY on Jul 17, 2024 09:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

