भिवंडी येथे प्लॅस्टिक गोदामाला आग (प्रतिमा सौजन्य : ट्विटर)

मुंबई येथील भिंवडी येथे एका प्लॅस्टिक गोदामाला आग लागली आहे. आग आटोक्यात आणण्यासठी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. भवंडी गावातील राहनाल गावात ही आग लागल्याचे समजते.

दरम्यान, आगिचे लोट आकाशाच्या दिशेने झेपावत असताना परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जावान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आग लागल्याचा परिसर हा रहदारी आणि दाटीवाटीचा असल्याने आग आटोक्यात आणण्यास अडथळे निर्माण होत आहेत.

पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वाहतूक काही काळ थांबवली आहे. दरम्यान, आग लागलेल्या ठिकाणी परिसरातील नागरीकांनी गर्दी केली आहे.