Pandharpur Wari Palkhi Marg Inauguration: पंढरपूर पालखी मार्गावर दुतर्फा वृक्षारोपण करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वारकऱ्यांना अवाहन
Pandharpur Wari Palkhi Marg Inauguration (Photo Credit - Twitter)

पंढरपूर वारी पालखी मार्गाचा शुभारंभ (Pandharpur Wari Palkhi Marg Inauguration) आज (11 नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झाला. या वेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वारी परंपरेचे भरभरुन कौतुक केले. तसेच, हा पालखीमार्ग वारीसाठी कसा आणि किती फायद्याचा ठरेल याबबतही सांगतिले. दरम्यान, पालखी मार्गावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर सावली देणारे डेरेदार वृक्षारोपण ( Tree Planting ) करा असे अवाहनही पंतप्रधानांनी या वेळी केले. पंढरपूरकडे जाणारे हे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी मार्ग भागवत धर्माची पथाका आणखी उंचावेल, असेही पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले.

पंढरपूर वारी पालखी मार्गाचा शुभारंभ (Pandharpur Wari Palkhi Marg Inauguration) आज (11 नोव्हेंबर) ऑनलाईन पद्धतीने पार पडले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. या कार्यक्रमसाठी पंढरपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री कपिल पाटील, रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के सिंग, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, भाजपचे प्रदेश्याध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि अनेक नागरिक उपस्थित होते. (हेही वाचा, Pandharpur Wari Palkhi Marg Inauguration: वारीच्या भक्तीमार्गाने देशाची वाटचाल सुरु- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी रामकृष्ण हरी... रामकृष्ण हरी म्हणत मराठीतून बोलत उपस्थितांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. या वेळी त्यांनी संत तुकाराम यांच्या अनेक अभंगांचा आणि ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील काही ओळींचा आधार घेत भाषणात वापरल केला. शंकराचार्यांनी म्हटले आहे की, पंढरपूर हे आनंदाचे प्रत्यक्ष रुप आहे. वारी हे एकमेव असे ठिकाण आहे. ज्या ठिकाणी सर्व भेदाभेद विसरुण लोक एकत्र येतात. वारकऱ्यांची जात, गोत्र हे सर्व एकच आहे. त्यामुळे मी जेव्हा सबका साथ, सबका विकास म्हणतो त्यापाठीमागे हीच भावना असल्याचे पंतप्रधान या वेळी म्हणाले.