पिंपरी चिंचवड शहरातील मोरवाडी कोर्टाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत भीषण आग लागली आहे. मागील काही वेळापासून ही आग धगधगत आहे. (Pimpri Chinchwad) शहरातील परिसरात लागलेल्या या आगीमुळे आणि आगीच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांचा आरोग्य धोक्यात आहे. पिंपरी चिंचवड शहरातील मोरवाडी कोर्टाजवळच्या मोकड्या जागेत ज्या ठिकाणी आग (Fire) लागली; त्या ठिकाणापासून काही अंतरावर वेगवेगळ्या इंडस्ट्रियल कंपन्या आणि नागरिकांची घर आहेत.

पाहा व्हिडिओ -

इंडस्ट्रियल कंपन्या आणि नागरिकांची घर आहेत. त्यामुळे इंडस्ट्रियल कंपन्या आपला कचरा मोरवाडी कोर्टाजवळील मोकळ्या जागेत फेकून देतात. त्याच इंडस्ट्रियल गारबेजने पेठ घेतला असावा असा अग्निशमन विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेचे सात- आठ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभाग शर्तीचे प्रयत्न करत आहे.

टायरच्या गोदामात ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरले असून यामुळे लोकांना मोठा त्रास हा सहन करावा लागत आहे.