Phule Trailer | Instagram@zeestudiosofficial

अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ (Phule) या चित्रपटावर ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेत आता नवा वाद निर्मण झाला आहे. ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे (Anand Dave) यांनी फुले चित्रपट जातीय वाद वाढवणारा आहे असं वक्तव्य करत त्यांनी सिनेमातील काही सीन्स वर आक्षेप घेतला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझर वर प्रतिक्रिया देताना त्यांनी आपला निषेध नोंदवला आहे. हा सिनेमा 11 एप्रिल दिवशी रीलीज होणार आहे. पण त्यापूर्वी सुरू झालेल्या या वादावरून आता चर्चा सुरू झाली आहे.

फुले चित्रपटामध्ये कशावर आक्षेप?

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सिनेमा जातीय तेढ वाढवण्यास कारणीभूत ठरेल असं म्हटलं आहे. सिनेमा एकतर्फी नको. पुण्यात शाळेसाठी जागा देणारे भिडे असो, शिक्षक म्हणून जाणारे काही ब्राह्मण असो, स्वत:ची मुलं विद्यार्थी म्हणून पाठवणारी लोकं असो.. असं अनेकांनी सहकार्यसुद्धा केलं आहे. मग तुम्ही ते दाखवणार आहात का? किंवा ते दाखवलं आहे का? असा सवाल दवे यांनी विचारला आहे. दरम्यान लग्नात गेले म्हणून महात्मा फुलेंना मारहाण झाल्याच्या घटनेवर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप आहे.  Phule Trailer: महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर बेतलेल्या ‘फुले’ हिंदी सिनेमाचा ट्रेलर रीलीज; Pratik Gandhi, Patralekhaa मुख्य भूमिकेत (Watch video).   

सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक छगन भुजबळांच्या भेटीला

फुले या चित्रपटाच्या दिग्दर्शक अनंत महादेवन आणि निर्मात्यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे.सिनेमॅटिक लिबर्टी प्रत्येक दिग्दर्शक घेत असतो मात्र या चित्रपटात वस्तुस्थिती दाखवण्यात आली आहे. अनेक पुस्तकांचा आणि विविध उपलब्ध साधनांचा अभ्यास करूनच हा चित्रपट बनविण्यात आला असल्याचे अनंत महादेवन म्हणाले आहेत. निर्माते अनुया चौहान कुडेचा, निर्माते रितेश कुडेचा आणि सह निर्माते रोहन गोडांबे आज भुजबळांच्या भेटीला पोहचले होते.