Petrol-Diesel Price in Maharashtra: महाराष्ट्रात इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल 100 च्या पार, पाहूयात आजचे दर
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

मागील आठवड्यात स्थिरावलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरात आज सलग दुस-या दिवशी वाढ होऊन आज महाराष्ट्रात इंधनदरवाढीचा भडका उडाला आहे. goodreturns ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज पेट्रोलचा दर 98.12 रुपये प्रति लीटर इतका आहे. तर डिझेलचा दर 89.48 रुपये प्रति लीटर इतका आहे. तर नांदेड, परभणी या जिल्ह्यांत पेट्रोलचे दर शंभरीच्या पार गेले आहेत. त्याचबरोबर अन्य जिल्ह्यांत पेट्रोलचे दर हे शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. ही दरवाढीमुळे महाभाईचा विस्फोट होणार हे वेगळं सांगायची गरज नाही.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने भाजीपाला, फळे, धान्ये यांसारख्या गोष्टी देखील महागणार आहेत. त्यामुळे ही इंधनदरवाढ सामान्य नागरिकांच्या खिशाला चांगला चाप बसवणारी आहे.हेदेखील वाचा- Petrol Diesel Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीला पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या मुंबई, नवी दिल्लीसह महत्त्वाच्या शहरांतील आजचे दर

पाहूयात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांतील आजचे दर (11 मे 2021)

शहर पेट्रोल (प्रति लीटर रुपये)  डिझेल (प्रति लीटर रुपये)
मुंबई 98.12 89.48
पुणे 97.91 87.92
ठाणे 97.84 87.82
नांदेड 100.27 90.2
परभणी 100.81 90.7
सिंधुदुर्ग 99.63 89.6
रत्नागिरी 98.96 88.9
औरंगाबाद 99.31 90.68
कोल्हापूर 98.27 88.29
नाशिक 98.52 88.5

देशातील सर्व राज्यांमध्ये विकलेल्या जाणाऱ्या इंधनाचे दर थोड्या अधिक प्रमाणात अशाच प्रकारे वाढतात. ज्याचा थेट बोजा हा सर्वसामान्य जनतेच्या खिशावर पडतो. ज्यामुळे महागाई वाढते आणि सर्वसामान्यांचा त्रासही.

देशातील तीन तेल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC कडून रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले जातात. नव्या दरांसाठी तुम्ही या कंपन्यांच्या वेबसाइट्सला भेट देऊ शकता. या व्यतिरिक्त फोनवरुन SMS च्या माध्यमातून सुद्धा दर तपासून पाहू शकता. तर 92249 92249 या क्रमांकावर SMS पाठवून पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही जाणून घेऊ शकता.