भारतात सलग नवव्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या (Petrol Diesel) किंमतीत वाढ झाली आहे. आजच्या नव्या दरानुसार नवी दिल्लीत (Navi Delhi) पेट्रोल 0.48 रुपयांनी महागले असून डिझेलमध्ये 0.59 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे महाराष्ट्रातही मुंबईसह (Mumbai) अनेक जिल्ह्यांत पेट्रोल डिझेल महागले आहे. आज मुंबईत पेट्रोल 0.60 पैशांनी महागले असून आजचा दर 82.70 इतका आहे. तर डिझेल 0.61 रुपयांनी महागले असून आजचे दर 72.64 इतका आहे. कोल्हापूर (Kolhapur), पुणे (Pune) आणि यवतमाळ (Yavatmal) हे जिल्हे सोडून अन्य सर्व जिल्ह्यात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे.
कोल्हापूर मध्ये पेट्रोल 82.94 तर डिझेल 71.82 रुपये झाले आहे. पुण्यातही पेट्रोल-डिझेलचा दर अनुक्रमे 82.40 आणि 71.28 रुपये इतका आहे. Petrol and Diesel Prices in India: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सलग 8 व्या दिवशी वाढ; 14 जून रोजी देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर? जाणून घ्या
पाहूयात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेल दर
जिल्हा | पेट्रोल दर | डिझेल दर |
नाशिक | 83.14 | 71.99 |
ठाणे | 82.29 | 71.15 |
औरंगाबाद | 83.06 | 71.91 |
सातारा | 83.42 | 72.25 |
सिंधुदुर्ग | 84 | 72.85 |
रत्नागिरी | 83.97 | 72.78 |
धुळे | 82.9 | 71.77 |
तब्बल 80 दिवसांनंतर 7 जून पासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येक दिवशी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 16 मार्च रोजी वाढ झाली होती. त्यानंतर कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे तब्बल 3 महिने पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता. तज्ञांनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे आता तेल कंपन्याही ग्राहकांकडून वाढलेल्या किंमती वसूल करत आहे.