भारतात सलग आठव्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या (Petrol-Diesel) दरात वाढ झाली आहे. दिल्लील (Delhi) आज सकाळी 6 वाजल्यापासून पेट्रोलच्या किंमती मध्ये 65 पैशांनी वाढ झाली असून डिझेलची किंमत 64 पैशांनी वाढली आहे. यापूर्वी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 75.78 रुपये तर डिझेलची किंमत 74.03 रुपये इतकी होती. दिल्ली प्रमाणेच देशातील इतर शहरांमध्ये देखील पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे.
मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 60 पैशांनी वाढली असून डिझेलच्या किंमतीत 61 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमती अनुक्रमे 82.70 रुपये आणि 72.64 रुपये इतक्या आहेत. चेन्नईत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 54 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे चेन्नईत पेट्रोल 79.53 आणि डिझेल 72.18 रुपयांना विकले जात आहे. दरम्यान कोलकाता येथे पेट्रोल 77.64 रुपये आणि डिझेल 69.80 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे कोलकाता येथे पेट्रोल 61 पैशांनी तर डिझेल 57 पैशांनी महागले आहे.
पहा महत्त्वाच्या शहरांमधील पेट्रोल डिझेलच्या किंमती:
शहरं |
पेट्रोल दर |
डिझेल दर |
मुंबई | रु. 82.70 | रु. 72.64 |
दिल्ली | रु. 75.78 | रु. 74.03 |
चेन्नई | रु. 79.53 | रु. 72.18 |
कोलकाता | रु. 77.64 | रु. 69.80 |
तब्बल 80 दिवसांनंतर 7 जून पासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येक दिवशी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 16 मार्च रोजी वाढ झाली होती. त्यानंतर कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे तब्बल 3 महिने पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता. तज्ञांनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे आता तेल कंपन्याही ग्राहकांकडून वाढलेल्या किंमती वसूल करत आहे.