Petrol | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

दररोजच्या दरवाढीने हैराण असलेल्या सामान्य ग्राहकांना आज (7 एप्रिल) काहीसा दिलासा मिळाला आहे. आज पेट्रोल, डिझेल दरात कोणत्याही प्रकारे बदल झाला नाही. त्यामुळे हे दर (Petrol-Diesel Price) स्थिर आहेत. असे असले तरी एकूण देशभरातच पेट्रोल प्रचंड महाग दराने विकले जात आहे. भारतीय इंधन इतिहासातील सर्वोच्च दराने इंधन विकले जात आहे. पेट्रोल, डिझेल दरांनी शंभरी केव्हाच पार केली आहे. महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात (Parbhani District) तर पेट्रोल भारतातील सर्वात महाग म्हणजेच सर्वोच्च दराने विकले जात आहे. 22 मार्च नंतर 14 वेळा झालेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीत परभणी अव्वल राहिली आहे.

बावीस मार्चनंतर आजपर्यंत जवळपास 10 रुपयांनी दर वाढले आहेत. 4 नोव्हेंबर 2021 नंतर जवळपास चार महिने इंधन कंपन्यांनी दरवाढ रोखून धरली होती. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणीपूर या पाच राज्यांच्या विधानसभांच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ रोखण्यात आल्याची चर्चा होती. काही असले तरी त्या काळात जनतेला काहीसा दिलासा मिळाला खरा. परंतू, त्यानंतर सरासरी 80 पैशांनी दरवाढ होत गेली.  (हेही वाचा, Hydrogen Car: देशातील पहिली हायड्रोजन कार झाली लाँच; एकदा टाकी भरली की धावणार तब्बल 650 किमी (Watch Video))

राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोल, 105.41 रुपयांवर स्थिर आहे. तर देशातील इतर विविध शहरांमध्येही इंधन दरांमध्ये स्थिरता असली तरी सर्वोच्चता कायम आहे. महाराष्ट्रातील परभणी येथे तर पेट्रोल दर प्रति लिटर 123.53 रुपये इतका झाला आहे. परभणीतील पेट्रोल दर देशातील सर्वोच्च आहे.

देशातील महत्त्वाच्या शहरांतील इंधन दर

शहरं  पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई 120.51 रुपये 104.77 रुपये
दिल्ली 105.41 रुपये 96.67 रुपये
चेन्नई 110.85 रुपये 100.94 रुपये
कोलकाता  115.12 रुपये 99.83 रुपये

विदेशी विनिमय दराबरोबरचं आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किंमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दरही दररोज बदलत असतात. तेल विपणन कंपन्या दरांचा आढावा घेतल्यानंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेल दरात बदल करतात.

एसएमएसद्वारे आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या

आपण एसएमएसद्वारे दररोज आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत देखील तपासू शकता. इंडियन ऑईल (आयओसी) ग्राहक RSP<डीलर कोड> लिहून 9224992249 वर पाठवू शकतात आणि एचपीसीएल ग्राहक (HPCL) <डीलर कोड> लिहून 9222201122 वर पाठवू शकतात. बीपीसीएल ग्राहक (BPCL) RSP <डीलर कोड> लिहून 9223112222 या क्रमांकावर पाठवू शकता