महाराष्ट्रामध्ये काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मध्ये राज्यात इंधनाचे दर कमी करण्याचा निर्णय झाला आहे. शिंदे सरकारने केलेल्या घोषणेनुसार, पेट्रोल 5 रूपये आणि डिझेल 3 रूपयांनी स्वस्त झाले आहे. दरम्यान दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलियम कंपन्यांकडून आजच्या दिवसाचा पेट्रोल, डिझेल दर जाहीर करतात. मग जाणून घ्या नव्या दरकपातीनंतर आज नेमका महराष्ट्रात प्रमुख शहरामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा दर काय आहे?
आज 15 जुलै साठी मुंबई मध्ये पेट्रोल साठी प्रतिलीटर 106.31 रूपये मोजावे लागत आहे तर डिझेलसाठी प्रतिलीटर 94.27 रूपये मोजावे लागणार आहेत. पुण्यात हाच दर पेट्रोल, डिझेलसाठी अनुक्रमे 106.17 आणि 92.68 रूपये आहे. महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील इंधनाचा दर इथे पहा एका क्लिक वर!
पेट्रोलियम कंपन्यांकडून जाहीर केलेल्या दरावर नंतर राज्याचा व्हॅट इतर कमिशन यांची गोळाबेरीज करून अंतिम दर ठरवला जातो. इंडियन ऑयल SMS सेवेच्या माध्यमातून मोबाइल नंबर 9224992249 वर SMS पाठवू शकता. त्यासाठी आपला मेसेज असा लिहायला हवा. RSP<स्पेस>पेट्रोल पंप डीलर कोड. आपल्या परिसरातील RSP साईटवर जाऊन तपासू शकता. हा मेसेज पाठवल्यानंतर काही सेकंदात आपल्या फोनवर ताजे पेट्रोल, डिझेल दर उपलब्ध होऊ शकतात. HPCL ग्राहक HPPrice लिहून 9222201122 क्रमांकावर संदेश पाठवूनही माहिती मिळवू शकतात.
महाराष्ट्रात सत्तांतरानंतर विशेष अधिवेशनादरम्यान विधिमंडळात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा देणार असल्याचा शब्द दिला होता. केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी कमी केल्यानंतर राज्य सरकारने व्हॅट कमी करावा अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका बैठकीत राज्यांना केली होती. अनेक राज्यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर व्हॅट कमी केला होता. मात्र महाराष्ट्रात याबाबत निर्णय झाला नव्हता. त्यामुळे या इंधनकपातीची अनेकजण प्रतिक्षा करत होते.