Petrol - Diesel Price | Image Use For Representational Purpose | File Photo

कोरोना व्हायरसचं संकट सध्या जगभरात थैमान घालत आहे. अशामध्ये कच्चा तेलाचे दर घसरत आहेत. मागील 14 दिवसांपासून मुंबई, दिल्लीसह देशभरात पेट्रोल, डीझेलचे दर कायम आहेत. आज (30 मार्च) ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून तेलाच्या दरात कोणतीच कपात करण्यात आलेली नाही. सध्या ग्लोबल मार्केटमध्येही क्रुड ऑईलचे भाव 5% घसरले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर सुमारे 25 डॉलर प्रति बॅरल इतके खाली गेले आहेत. 16 मार्चपासून पेट्रोल,डिझेलच्या दरामध्ये कोणताही बदल पहायला मिळालेला नाही. दिल्ली मध्ये पेट्रोल चे दर 69.59 रुपये प्रति लीटर आहेत तर डीझेलचे दर 62.29 रुपये प्रति लीटर इतके आहेत.

सर्वसाधारणपणे सकाळी सहा वाजता नियमित पेट्रोल, डिझेलचे दर अपडेट होत असतात. त्यावर कमिशन, टॅक्स आदींची भर पडून प्रत्येक शहराचा पेट्रोल, डिझेलचा दर ठरतो. दरम्यान एसएमएसच्या माध्यमातूनही तुम्हांला नियमित दर घसबसल्या मोबाईलवर पाहण्याची सोय आहे. इंडियन ऑईलचे कस्टमर RSP लिहून 9224992249 नंबर वर आणि बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 नंबर वर दर मोबाईलवर पाहू शकतात. तर एचपीसीएल ग्राहकांना HPPrice लिहून एसएमएस 9222201122 नंबरवर पाठवल्यास पेट्रोल, डिझेलचे दर पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल, डिझेलचे दर

शहर  पेट्रोल दर       डिझेल दर
कोल्हापूर 75.73 64.65
मुंबई 75.30 65.21
नागपूर 75.40 64.34
पुणे 75.35 64.26

भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा आता 1000 च्या च्यापलिकडे गेला आहे. सध्या देशात 942 जणांवर उपचार सुरू असून 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 99 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्रात आहे. या जागतिक आरोग्य संकटाचा आर्थिक फटका भारताप्रमाणे जगातील अनेक महत्त्वाच्या देशांना बसला आहे.