Payal Tadvi (Photo Credits: Facebook)

मुंबई: नायर हॉस्पिटल  (Nair Hospital) मधील रहिवाशी डॉक्टर पायल तडवी (Payal Tadvi) हिच्या आत्महत्येने सध्या सर्वत्र संतापजन्य वातावरण पाहायला मिळत आहे.जातीय मुद्द्यावरून होणाऱ्या छळाला कंटाळून पायल ने 22 मे रोजी हॉस्पिटलच्या हॉस्टेल मध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती.  पायलला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या मुंबई (Mumbai Congress) विभागाने देखील या प्रकरणात उडी घेत आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे.   पायलच्या आत्महत्येला कारणीभूत असणाऱ्या तीन आरोपी व निलंबित डॉक्टरांना अटक व्हावी असा या मोर्चाचा हेतू असणार आहे. आज नायर हॉस्पिटलच्या आवारातून संध्याकाळी 4.30 वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे.

मुंबई काँग्रेस ट्विट 

पायल तडवी आत्महत्या प्रकरणामध्ये डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तीन महिला डॉक्टरांचा समावेश होता.पायल हिडलीत समजतील असल्याने तिच्या जातीवरून या महिला डॉक्टर तिचा चाल करायच्या असा आरोप पायलच्या परिवाराने केला होता. यासंबंधी डॉ. तडवीच्या आत्महत्येनंतर सार्‍यांच स्तरातून निषेध नोंदवण्यात आला होता. काल (27 मे) दिवशी नायर हॉस्पिटल्सचे डीन यांनाही महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली होती.  मुंबई: नायर इस्पितळात त्रासाला कंटाळून रहिवाशी महिला डॉक्टरची आत्महत्या, अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

मार्डच्या कारवाईनंतर नायर हॉस्पिटलमधील या तिन्ही डॉक्टर्सचं निलंबन करण्यात आलं आहे. तसेच युनिट हेड चिंगलीग यांनादेखील बडतर्फ करण्यात आलं आहे. हे निलंबन पुढील नोटीस पर्यंत असेल.Nair Hospital Dr. Payal Tadvi Suicide Case: 'मार्ड' च्या कारवाईनंतर नायर हॉस्पिटलच्या प्रसुती विभाग प्रमुख सह 4 डॉक्टर्सचं निलंबन

पायलच्या फोनमध्ये आढळलेल्या व्हाट्सअँप चॅट्समध्ये तडवीचा सिनियर डॉक्टर्सकडून छळ होत असल्याचं समोर आलं आहे. आग्रिपाडा पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.