Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

नायर हॉस्पिटलमध्ये (Nair Hospital) 22 मे दिवशी सिनियर डॉक्टर्सच्या जातीवरून केलेल्या शेरेबाजी आणि छळाला कंटाळून डॉ पायल तडवी (Dr. Payal Tadvi) या शिकाऊ डॉक्टरने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामध्ये डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तीन महिला डॉक्टरांचा समावेश होता. मार्डच्या कारवाईनंतर नायर हॉस्पिटलमधील या तिन्ही डॉक्टर्सचं निलंबन करण्यात आलं आहे. तसेच युनिट हेड चिंगलीग यांनादेखील बडतर्फ करण्यात आलं आहे.   हे निलंबन पुढील नोटीस पर्यंत असेल.  मुंबई: नायर इस्पितळात त्रासाला कंटाळून रहिवाशी महिला डॉक्टरची आत्महत्या, अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

ANI Tweet

महाविद्यालयांमध्ये अ‍ॅन्टी रॅगिंग कायदे कडक असताना मुंबईसारख्या भागात अशा घटना होणं शरमेची बाब आहे. डॉ. तडवीच्या आत्महत्येनंतर सार्‍यांच स्तरातून निषेध नोंदवण्यात आला होता. काल (27 मे) दिवशी नायर हॉस्पिटल्सचे डीन यांनाही महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली होती. पुढील 8 दिवसांच्या आत डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली याचं उत्तर देणं बंधनकारक होतं. त्यानुसार आज अखेर तिन्ही संबंधित महिला डॉक्टर्सचं निलंबन करण्यात आलं आहे.

26 वर्षीय पायल तडवी पदव्युत्तर शिक्षण घेत होती. तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅट्समध्ये तडवीचा सिनियर डॉक्टर्सकडून छळ होत असल्याचं समोर आलं आहे. आग्रिपाडा पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.