Sanjay Raut | (Photo Credit - Twitter)

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना 8 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी (ED Custody) सुनावण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा ईडी कोठडीतील ( Sanjay Raut in ED Custody) मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांना 10 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी द्यावी अशी मागणी ईडीने केली होती. मात्र, न्यायालायाने 8 ऑगस्ट पर्यंतच ईडी कोठडी सुनावली. संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळा (Patra Chawl Scam) प्रकरणात अंमलमजावणी संचालनालयाने अटक केली आहे. ईडी कोठडीची मुदत आज संपल्याने त्यांना कोर्टासमोर पुन्हा हजर करण्यात आले.

संजय राऊत यांना ईडी कोठडी मिळावी यासाठी ईडीच्या वकीलांनी जोरदार युक्तीवाद केला. संजय राऊत यांच्या विरोधात अनेक पुरावे समोर आल्याचा दावा ईडीने कोर्टात केला. तर याच प्रकरणाशी संबंधीत असलेल्या स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्याकडून आपल्याला धमकावले जात असल्याचा दावा आपल्या वकीला मार्फत केला. दरम्यान, आपणास जे काही सांगायचे ते ईडीला सांगा. आपण जे आरोप करता आहात त्यासाठी कोर्ट ही जागा नाही, असे स्वप्ना पाटकर यांना कोर्टाने सांगितले. (हेही वाचा, Shiv Sena: शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरे गटाला दिलासा, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगास महत्त्वपूर्ण निर्देश)

दरम्यान, संजय राऊत यांनीही ईडीविरोधात कोर्टात तक्रार केली. ईडी कोठडीत आपल्याला काही त्रास आहे का? असा सवाल कोर्टाने सुनावणीच्या सुरुवातीलाच संजय राऊत यांना विचारला. या प्रश्नाच्या उत्तरादाखल संजय राऊत यांनी ईडीविरोधात आपली नाराजी आणि तक्रार बोलून दाखवली. आपल्याला ज्या ठिकाणी ठेवले आहे त्या ठिकाणी पुरेशी मोकळी हवा नाही. योग्य प्रमाणात हवा खेळती राहात नाही. वातावरण अतिशय कोंदट असल्याची तक्रार संजय राऊत यांनी ईडीविरोधात केली. यावर कोर्टाने तत्काळ दखल घेत ईडीला झापले. यावर ईडीने आपण यापुढे आवश्यक ती व्यवस्था करु असे कोर्टाला सांगितले. दरम्यान, संजय राऊत चुकीचे बोलत आहेत. राऊत यांना वातानुकुलीत खोलीत ठेवण्यात आल्याचेही ईडीने सांगितले.

ट्विट

ईडने कोर्टात दावा केला की, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अनोळखी व्यक्तीकडून पैसे मिळाल्याचे पुरावे मिळाले आहेत. शिवाय प्रविण राऊत यांच्याकडून मिळालेल्या पैशातून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये जमीनीची खरेदी केल्याचा दावा ईडीने कोर्टात केला. तसेच, याच प्रकरणाशी संबंधीत असलेल्या ईतर लोकांची चौकशीही सोमवारपर्यंत करू असे ईडीने सांगितले.