मुंबई. शिवडी येथे क्षयरोगाच्या आजाराला त्रस्त होऊन एका रुग्णाची आत्महत्या
Image used for Representational Purpose | (Photo Credits: File Photo)

मुंबईतील (Mumbai) शिवडी (Sewri) रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत एका रुग्णाने आत्महत्या (Sucide) केली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.  क्षयरोगाच्या आजाराला त्रस्त होऊन रुग्णाने स्वत:चे जीवन संपवले, अशी माहिती समोर आली आहे. मृताचे शरीर शवविच्छेदनसाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. महत्वाचे म्हणजे, क्षयरोगाच्या त्रासाला वैतागून आतापर्यंत या रुग्णालयात 24 रुग्णाने आत्महत्या केली आहे. यापैकी सर्व घटना नैराश्यातून घडल्या आहेत. यामुळे अशा प्रकारच्या रुग्णांना समउपदेश देण्याची अधिक गरज आहे, असे शिवडी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे.

मरियप्पा कांबळे असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव आहे. तब्बल आठ वर्षापासून मरियप्पा याच्यावर क्षयरोगाचा उपचार सुरु होता. मरियप्पाने गेल्या चार महिन्यापूर्वी स्वत:ला शिवडी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, रुग्णालयात दाखल झाल्यापासून मरियप्पाचे एकही नातेवाईक त्याला भेटायला आले नाही. तसेच त्याला क्षयरोग असल्यामुळे अधिक औषधाचे सेवन करावे लागत होते. या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज शिवडी रुग्णालयातील डॉक्टरांनी लावला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरियप्पा याचे मृत शरीर शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर मृताच्या नातेवाईक किंवा मित्राशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. हे देखील वाचा- World Suicide Prevention Day 2019: जगभरात दररोज किती लोक आत्महत्या करतात माहिती आहे?

मुंबई येथील रुग्णालयात आतापर्यंत 24 रुग्णांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. जगभरात क्षयरोगाचे जवळपास 1 कोटी रुग्ण असून भारतात तब्बल 20 लाख 7 हजार रुग्ण आहेत.