पुण्याचे प्रसिद्ध उद्योगपती गौतम पाषाणकर (Gautam Pashankar) हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. तर बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला एक नोट देत ती घरी देण्यास सांगितली होती. मात्र 24 तास उलटल्यानंतर पाषाणकर घरी न आल्याने त्यांची अखेर पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यांचा शोध घेण्यासाठी शहरात पोस्टर ही लावले आहेत. तसेच पोलीस पथकाकडून सुद्धा सातत्याने त्यांचा शोध घेतला जात आहे. तर आता 9 दिवस उलटले तरीही पाषाणकर अद्याप भेटलेले नाहीत. त्यांचा परिवार सुद्धा त्यांची वाट पाहत असून पत्नीने गौतम यांना घरी परतण्याची साद घातली आहे.
पाषाणकर ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर गौतम पाषाणकर हे पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर आहेत. पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षात त्यांना उद्योगात फार मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे नुकसानीत अधिक भर पडली गेली.(Youth Arrested For Defaming Uddhav Thackeray: सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी करणारा तरूण अटकेत)
दरम्यान, पाषाणकर यांनी परिवाराला देण्यासाठी दिलेली चिठ्ठी ही सुसाइट नोट असून त्यात त्यांनी मला उद्योगात फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. ही माहिती शिवाजी पोलीस स्थानकातून देण्यात आली आहे. नावलौकिक अशा उद्योगपतीने अशा पद्धतीने बेपत्ता होणे हे धक्कादायक आहे. याच कारणास्तव पोलिसांकडून परिसरातील सीसीटिव्ही फुटेज सुद्धा तपासून पाहत आहेत.
गौतम यांच्याकडे आलिशान बाइक्सची डिलरशीप होती. या व्यतिरिक्त पाषाणकर ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टरचे पद ही त्यांच्याकडे होते. ही कंपनी रियल्टी, फायनान्स आणि फार्मास्युटिकल कंसल्टेंसीच्या रुपात काम करते. परिवाराच्या सुत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर 100-150 कोटी रुपयांचे कर्ज होते. लॉकडाऊन मध्ये झालेल्या नुकसानीमुळेच ते मानसिक तणावात होते. तपासात हे सुद्धा समोर आले की, काही दिवसांपूर्वी त्यांचा 65वा वाढदिवस ही परिवाराने साजरा केला होता.